दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देरकर यांच्याशी चर्चा

विविध समस्यांवर चर्चा; विकास निधीच्या योग्य विनियोगाची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासह त्यांना न्याय्य हक्क आणि समान संधी मिळवून देण्याच्या मागण्यांसंदर्भात वणी येथे आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिव्यांगांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून विविध मागण्या आमदार देरकर यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनाद्वारे दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळावे, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या निधीचा योग्य विनियोग करून त्यांना आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत मिळावी, याबाबतही चर्चा झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिव्यांगांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी, शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या समस्या आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णयप्रक्रियेत प्रतिनिधित्व, शासकीय योजनांचा सुलभ लाभ आणि आर्थिक स्वावलंबनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दिव्यांग बांधवांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांना समान संधी मिळाव्यात आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले.

Comments are closed.