झोला येथील स्वामी समर्थ भजन महिला मंडळाला भजन साहित्य भेट

वेदा रेस्टॉरंटचे संचालक अखिल सातोकर यांचा स्तुत्य उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी : येथील स्वामी समर्थ भजन महिला मंडळाला वेदा रेस्टॉरंटचे संचालक अखिल सातोकर यांच्या हस्ते भजन साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमातून मंडळाच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला भजन मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे मंडळाच्या धार्मिक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला विद्या सुरतीकार, कल्पना बोडाले, वंदनाबाई उपरे, दमंताबाई सुर, आशा सुरतीकार, अर्चना, राजू मेश्राम, तात्याजी सुर, विकास रासेकर, राजू रासेकर, बंडू लांडगे, गजू कनाके, प्रवीण सातपुते आणि रवी ढोके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed.